'हो' म्हणालीस तर तूच ती
'नाही' तर 'कोई और ही सही' ...
आलीस तर तुज्या सोबत
नाही तर 'कोई गम नहीं '...
अजब-अनोखी दुनिया मजेत पाहत राहीन
आयुष्याचा गाडा तसाच ओढत नेइन ...
आयुष्य सुन्दर आहे
ते आणिक सुन्दर बनवत राहीन ...
कारण प्रेमात तुज्या
त्या सुखाचा स्पर्श जाला...
विसरून गेलो की
'दुखः म्हणतात कशाला ?'
---चैतन्य Enjoy...
Thursday, June 18, 2009
आयुष्याचा राडा...(प्रेमात तुज्या )
Posted by chaitanya at 11:23 AM 0 comments
Sunday, June 14, 2009
अशी सुचली कविता
"कट्ट्यावर मी बसलो होतो
मन मनातून खचलो होतो
मनी वाटले तिला पाहावे
पाखरांसवे उंच उडावे
ढगासंगे गाणे गावे
रुतुराजाचे येणे व्हावे
मग अचानक ती मला दिसली
आणि ही कविता सुचली "
----चैतन्य say's Enjoy
Posted by chaitanya at 9:57 AM 0 comments
Wednesday, January 14, 2009
दोघी
वेडावुन फिरतो मी ,कधी हिच्या मागे कधी तिच्या मागे
त्या दोघी शिवाय जिवन मला वाटे अभागे
कोणी म्हणे वेडा मी, कोणी म्हणे मी पिसा
मी कुणाच्या नाही कामाचा, रिकामा माझा खिसा
तरी ही असा मी 'वेगळा-वेगळा', मुळीच एकटा नाही
माझ्या आशा आणि कल्पना सदैव सोबत राही
साखर झोपेतील स्वप्ने, स्वप्ने ती कसली?
झोप उडवतील माझी, तीच खरी असली
कल्पनेच्या सिद्धीला यत्नांचे पंख हवे
दाटलेल्या आकाशात दिसती आशेचे किरण नवे
कधी तरी थकलेल्या मनाला ग्रासते निराशा
हुं! तरी ही त्या निराशेत ही आहेच ना आशा
--चैतन्य
Posted by chaitanya at 7:10 AM 0 comments
Saturday, January 10, 2009
प्र्भुरामाचा सैनिक मी
प्र्भुरामाचा सैनिक मी
आशिष देती वाल्मीकी
रामभक्त थोर ते श्री लक्ष्मण
खल नाशती सोडुनी बाण
दुष्टांचा करतो अंत
मार्गदर्शक श्री हनुमंत
सुग्रिव आमचे महाराज
राम नाम हे कामकाज
जांबुवंत बलशाली सेनापती
कृपा करी श्रीरघुकुलपती
नल-निल सेतुचे अभियंते
प्र्भु श्रीराम विश्वाचे नियंते
रामसेवेत होई जिव धन्य
अंतरी वसे ब्र्म्हमयी चैतन्य
'हरहर महादेव' चा होई गजर
शुभ संकेत घेवुनी आला प्रहर
हाती घेवुन भगवा ध्वज
आनंदे नाचती अनुज
धर्माचा विजय निश्चित,शंका नाही
अधर्म्यास करुन सोडु,ञाही ञाही
असा हा रामसेवक मी वानर
अनुभवतो श्रीराममय चराचर
जय जय रघुविर समर्थ!
--चैतन्य
Posted by chaitanya at 9:41 PM 0 comments