Thursday, June 18, 2009

आयुष्याचा राडा...(प्रेमात तुज्या )

'हो' म्हणालीस तर तूच ती
'नाही' तर 'कोई और ही सही' ...
आलीस तर तुज्या सोबत
नाही तर 'कोई गम नहीं '...

अजब-अनोखी दुनिया मजेत पाहत राहीन
आयुष्याचा गाडा तसाच ओढत नेइन ...
आयुष्य सुन्दर आहे
ते आणिक सुन्दर बनवत राहीन ...

कारण प्रेमात तुज्या
त्या सुखाचा स्पर्श जाला...
विसरून गेलो की
'दुखः म्हणतात कशाला ?'

---चैतन्य Enjoy...

Sunday, June 14, 2009

अशी सुचली कविता

"कट्ट्यावर मी बसलो होतो
मन मनातून खचलो होतो

मनी वाटले तिला पाहावे
पाखरांसवे उंच उडावे

ढगासंगे गाणे गावे
रुतुराजाचे येणे व्हावे

मग अचानक ती मला दिसली
आणि ही कविता सुचली "

----चैतन्य say's Enjoy

Wednesday, January 14, 2009

दोघी

वेडावुन फिरतो मी ,कधी हिच्या मागे कधी तिच्या मागे
त्या दोघी शिवाय जिवन मला वाटे अभागे


कोणी म्हणे वेडा मी, कोणी म्हणे मी पिसा
मी कुणाच्या नाही कामाचा, रिकामा माझा खिसा


तरी ही असा मी 'वेगळा-वेगळा', मुळीच एकटा नाही
माझ्या आशा आणि कल्पना सदैव सोबत राही

साखर झोपेतील स्वप्ने, स्वप्ने ती कसली?
झोप उडवतील माझी, तीच खरी असली

कल्पनेच्या सिद्धीला यत्नांचे पंख हवे
दाटलेल्या आकाशात दिसती आशेचे किरण नवे

कधी तरी थकलेल्या मनाला ग्रासते निराशा
हुं! तरी ही त्या निराशेत ही आहेच ना आशा


--चैतन्य

Saturday, January 10, 2009

प्र्भुरामाचा सैनिक मी








| श्रीराम |

प्र्भुरामाचा सैनिक मी
आशिष देती वाल्मीकी

रामभक्त थोर ते श्री लक्ष्मण
खल नाशती सोडुनी बाण

दुष्टांचा करतो अंत
मार्गदर्शक श्री हनुमंत

सुग्रिव आमचे महाराज
राम नाम हे कामकाज

जांबुवंत बलशाली सेनापती
कृपा करी श्रीरघुकुलपती

नल-निल सेतुचे अभियंते
प्र्भु श्रीराम विश्वाचे नियंते

रामसेवेत होई जिव धन्य
अंतरी वसे ब्र्म्हमयी चैतन्य

'हरहर महादेव' चा होई गजर
शुभ संकेत घेवुनी आला प्रहर

हाती घेवुन भगवा ध्वज
आनंदे नाचती अनुज

धर्माचा विजय निश्चित,शंका नाही
अधर्म्यास करुन सोडु,ञाही ञाही

असा हा रामसेवक मी वानर
अनुभवतो श्रीराममय चराचर

जय जय रघुविर समर्थ!

--चैतन्य

Thursday, December 11, 2008

मुंबईहुन...

मुंबईहुन...











हजारो वर्ष कत्तला झाल्या आमच्याच फक्त
छाटली शिर आमचीच,धो धो वाहिलं रक्त

काफिरांना मारुन म्हणे त्यांना मिळतो स्वर्ग?
'अशा छोटया घटना घडतातच' हा कसला तर्क?

जिहादींनी घुसुन यावं आणि गोळ्या घालुन जावं
'रोजचच आहे' या भावात आम्ही पुन्हा सुरु व्हावं
कोरडे पडले अश्रु,गोठल्या का आमच्या भावना?
दुसरा गाल पुढे केल्या शिवाय का आम्हाला राहवेना?
दगड मारला की कुञ ही गुरगुरतं
मनातला राग ते ही व्यक्त करतं

आप्तांच्या श्राधात बंधु प्रेमाचे गोडवे अजुनही आम्ही गातोच का?
नुसत्या घोषणा,मेणबत्या पेटवुन्,दहशतीचा प्रश्न सुटतो का?

सोम्या जागी गोम्या मंञी झाला तर दहशदवाद मिटेल का?
नुसती श्रधांजली,नैतिक जवाबदारी घेवुन हा प्रश्न सुटेल का?

ईजिनियर लादेन अशिक्षीत असतो का?
विमान उडवणारा मुजाहिद सुशिक्षीत नसतो का?
ते धर्मांध असले तरी 'काफीरच मरत असतो' हे का?
मग सांगा दहशदवादाला धर्म नसतो का?

अटकेपार झेंडा लावणारं रक्त आमचं मुळीच नाही षंढ
पण ज्यांच्यावर विश्वास केला ते सरकार नेहमि प्रमाणे थंड
शिवरायाचे पुञ आम्ही पुन्हा करु रे बंड
आत्मरक्षण,अस्मितेच्या अध्यायाला पुन्हा जोडुया नवा खंड


---चैतन्य

Sunday, November 16, 2008

मला परत लहान व्हायचय

मित्रानो मला आनंद होतोय माजी नवी कविता सदर करताना.
लहानपण खुपच गमतीजमतीच असत पण त्या तुलनेत मोठेपण रुक्ष वाटत.
म्हनुनच ...'मला परत लहान व्हायचय '


मला परत लहान व्हायचय
धो धो पावसात पुन्हा चिन्ब भिजायचय
शालेला बुट्टी मारून खुप खुप खेलायचय
मला परत लहान व्हायचय


परीक्षेचा विषय असावा 'छान छान गोष्टी '
काढाव्या खोड्या करावी बेधुंद मस्ती
शाळेत सगले तास नेहमी ऑफ़ असावे
जाड्या रड्याला धपकन पाडून खदा खदा हसावे


जिगरी दोस्त आला नाही की कालजीत पडायचो
मस्ताराचा मार खावून खुप रडायचो
मधल्या सुट्टीत सगले डबा खायचो
कवितेच्या तासाला भारावून जायचो


मजा वाते म्हणुन चोरून वाजवायाचो शालेची घंटा
जिगरी दोस्तासाथी करायचो मारामारी-तनटा
कंताला आला की हळूच जायचो पलुन
रोजच शालेला का जायचा ? कधीच न आला कलुन

वाघोबच्या गोष्टी मला आत्ता कोणी सांगत नाही
चीवुचा घास मला आता कोणी भरवत नाही
आता असते असयन्मेंट आणि सबमिशनची घाई
कॉलेज क्लासची धावपल टेंशन काहिच्या काही


परीक्षा आली की पुस्तकांच वाटत ओज
आवाजांच्या गर्दित कोणी ऐकत नाही माज
लेकचरच असत कम्पल्शन
नेहमीच वाटत डिप्रेशन



मनातल्या भावना सांगू कश्या कुणाला ?
म्हनुनच हा कवितेचा विचार आला
ऐकत असशील तर देवा मला हेच तुला सांगायचय
प्लीज प्लीज 'मला परत लहान व्हायचय'

Wednesday, October 8, 2008

The Prince of the lost world

a long long ago,
there was a prince had no fear, no ego

he was loyal, brilliant and honest
many were brave but he was bravest

surrounded by people with their soul sold,
he was alone the prince of the lost world

his dream was big and vision was clear
he fought for it, his efforts were pure

he doesn't wanted chair or power
he only wished independent motherland forever

history proved "there is no freedom without gun and war"
he built army, he was revolutionary star

my people,
let's come together to complete his dream
let's build hindurashtra and let flow Hindu stream

let's come! join every Hindu
let's bring back the holy Sindhu

don't think how will it complete, don't have doubts and fear
it is task of lord, we will accomplish! the prince was sure


--at holy feet of Bharatmata
--at holy feet of Vir Savarkar


Blogger Templates by Isnaini Dot Com and Gold Mining Companies. Powered by Blogger