Wednesday, January 14, 2009

दोघी

वेडावुन फिरतो मी ,कधी हिच्या मागे कधी तिच्या मागे
त्या दोघी शिवाय जिवन मला वाटे अभागे


कोणी म्हणे वेडा मी, कोणी म्हणे मी पिसा
मी कुणाच्या नाही कामाचा, रिकामा माझा खिसा


तरी ही असा मी 'वेगळा-वेगळा', मुळीच एकटा नाही
माझ्या आशा आणि कल्पना सदैव सोबत राही

साखर झोपेतील स्वप्ने, स्वप्ने ती कसली?
झोप उडवतील माझी, तीच खरी असली

कल्पनेच्या सिद्धीला यत्नांचे पंख हवे
दाटलेल्या आकाशात दिसती आशेचे किरण नवे

कधी तरी थकलेल्या मनाला ग्रासते निराशा
हुं! तरी ही त्या निराशेत ही आहेच ना आशा


--चैतन्य

Saturday, January 10, 2009

प्र्भुरामाचा सैनिक मी








| श्रीराम |

प्र्भुरामाचा सैनिक मी
आशिष देती वाल्मीकी

रामभक्त थोर ते श्री लक्ष्मण
खल नाशती सोडुनी बाण

दुष्टांचा करतो अंत
मार्गदर्शक श्री हनुमंत

सुग्रिव आमचे महाराज
राम नाम हे कामकाज

जांबुवंत बलशाली सेनापती
कृपा करी श्रीरघुकुलपती

नल-निल सेतुचे अभियंते
प्र्भु श्रीराम विश्वाचे नियंते

रामसेवेत होई जिव धन्य
अंतरी वसे ब्र्म्हमयी चैतन्य

'हरहर महादेव' चा होई गजर
शुभ संकेत घेवुनी आला प्रहर

हाती घेवुन भगवा ध्वज
आनंदे नाचती अनुज

धर्माचा विजय निश्चित,शंका नाही
अधर्म्यास करुन सोडु,ञाही ञाही

असा हा रामसेवक मी वानर
अनुभवतो श्रीराममय चराचर

जय जय रघुविर समर्थ!

--चैतन्य


Blogger Templates by Isnaini Dot Com and Gold Mining Companies. Powered by Blogger